माझी भटकंती माहूर १११
☘️❄️☘️❄️☘️❄️☘️❄️
माझी भटकंती
भाग क्रमांक-१११
धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन २००० चौथा दिवस
🔆माहूरगड🔆
निसर्गरम्य परिसरात पर्यटन निवासस्थान होते.सकाळी लवकर उठून आवराआवर करुन माहुरगडावरील श्री रेणुकामातेच्या मंदिराकडे निघालो.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणून लौकिक असलेले देेवस्थाान आहे.हे मूळ व जागृत शक्तीपीठ आहे.चहुबाजूंनी डोंगररांगा आणि जंगल अशा निसर्गाच्या सानिध्यात माहुरगडावर हे मंदिर आहे.पौराणिक आणि प्राचीन मंदिर असून श्री परशुरामाची माता म्हणूनही श्री रेणुका माता देवीला ओळखले जाते.ही माता काही परिवाराची कुलदेवता आहे.या गडावर श्री दत्तात्रेय यांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.या गडावर श्री रेणुकामाता मंदीर, दत्तात्रेय मंदिर, श्री परशुराम मंदिर आणि माहूरगड (रामगड) इत्यादी प्रेक्षणिय स्थळे आहेत.
माहूर म्हणजे"आईचे हृदय "असलेले ठिकाण.श्री रेणुकामाता मंदीर कमलमुखी आकाराचे आहे.मंदिर यादव कालीन असून जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख मुख्य दरवाजाच्यावर आढळतो.या देवीच्या अनेक आख्यायिका आहेत.मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भागआहेत.
गाभाऱ्यात देवीचा चांदीचा वर्ख असलेला मुखवटा आहे.तांदळाच्या रुपातील मुखाची पूजा केली जाते.
चांदीनं मडविलेले प्रवेशद्वार आहे.तेजोमय चित्ताकर्षक देवीचे मुखकमल आपली नजर वेधून घेते.भाविकांना छत्रछाया देणारी मनोकामना पूर्ण करणारी माता.तेजपुंज मुखवटा, डोक्यावर चांदीचा टोप आणि भाळी मळवट भरलेले तेजोमय रुप.उभयता जोडीने दर्शनघेतले.मंगलमय, भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरणात दर्शनाचा लाभ मिळाला.सभामंडप परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानी मातेच्या मुर्तीं आहेत.तसेच अमृतकुंड, रामतीर्थ आणि मातृतिर्थ आहेत. मंदिर परिसरातील दुकानातून प्रसादपुडा व मुलांसाठी खेळणी घेतली.
तदनंतर आम्ही हॉटलेमध्ये नाष्टा करून पुढील प्रवासाला निघालो..
माहूरगड ते नागपूर हे अंतर सुमारे २३०किमी होते.
सहासात तासांचा प्रवास करावा लागणार होता. आम्हाला नागपूरला मुक्कामी जाणं महत्त्वाचं होतं .दुसऱ्या दिवशी नागपूर येथे रामलीला मैदानावर प्राथमिकशिक्षकांचे अधिवेशन होते.त्यामुळेआम्ही जवळा ,यवतमाळ,देवळी,
वर्धा या मार्गाने नागपूरला निघालो होतो.छोटेखानी घाट,चढ उतार करत आमचा प्रवास सुरु होता.यवतमाळ म्हणजे दगडी कोळशाचे आगर असणारा जिल्हा. उन्हाच्या रटातच आम्ही वर्ध्याला पोहोचलो.
वर्ध्यात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील दोन महापुरुषांचे आश्रम आहेत.ते बघायला आम्ही निघालो.
भेटूया उद्या आश्रमात तोपर्यंत नमस्कार ...🙏🏻
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment