निसर्ग सौंदर्य कविता धबधबा ५६
धबधब्याची नदी
जल दुधाळधवल कड्यातून धावती
प्रवाहीत पाण्याची
सलगधार दिसती
कातळावर पडून
तुषार मोती उडती
काठाच्या गवतावर
थेंबाड थेंबे पडती
काळे जलद वर्षावती
माथ्यावर कोसळती
कड्यावरुन धावती
त्याचे धबधबे दिसती
वसुंधरा साठवती
ओतप्रोत होती
जल उताराला
पाझरत जाती
ओंजळीने झऱ्यात जमती
सफेद जल वेगेप्रवाहिती
ओहळ,ओढे वाहती त्या
संगमाने नदीमाय बनती
नदीमाय प्रवाहिता
पिकविती शेतीभाती
जीवनवाहिनी बनती
कल्याणकारीनी होती|
Comments
Post a Comment