श्री शिवाजी निकम कौतुक लेख
पर्यटनप्रेमी शिक्षकमित्राचे कौतुक 🥀🌹
आमचे शिक्षक मित्र श्री रविंद्रकुमार(दादा) गणपत लटिंगे ओझर्डे ता.वाई यांनी लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आत्तापर्यंत केलेल्या सहली,भटकंती आणि प्रवासातील अनुभवाचे स्वत:च्या शब्दात शब्दांकन केले.त्याकाळातील समर्पक फोटोंची साथ मिळाल्याने लेखाचा आलेख उंचावला.
प्रवासातील स्वानुभवांची लेखात मांडणी केली.अभिव्यक्त होऊन छंद जोपासण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी सारे लेखन "माझी भटकंती ,साठवणीतल्या आठवणी" या साजेशा शिर्षकाने दररोज क्रमशःएक भागया क्रमाने दिनांक १४ एप्रिल २०२०पासून सलगपणे फेसबुक,
व्हाटसअप ग्रुप आणि ब्लाॅगवर प्रसिध्द केले.त्याचे शंभर भाग पूर्ण केले.ही भटकंती त्यांनी कुटूंब,मित्र,विद्यार्थी यांच्या समवेत केली.
त्यांच्या भटकंतीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी निसर्गरम्य सह्याद्रीच्या डोंगररांगा,कडे, गडकोट, जंगलवाटा,धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळास भेटी देऊन त्यांनी तेथील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अभ्यासही केला आहे.अफलातून प्रवासवर्णने सरांनी आपल्या सिद्धहस्तलेखणीतून साकारली आहेत.सरांच्या सातत्य व जिद्दीला सलाम.तसेच भेटी दिलेल्या सर्व स्थळांची तपशीलवार माहिती वाचणे म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणीच आहे. शतकी लेखमाला केल्याबद्दल आई प्रतिष्ठान वाठार (नि.)फलटण चे अध्यक्ष श्री गणेशजी तांबे सरांनी सन्मानपत्र देऊन व मिडीयाला बातमी देऊन कौतुक केले होते.तसेच आमचे मार्गदर्शक प्रेरणास्रोत पत्रकार शिक्षकमित्र श्री सुनील शेडगे सरांनी "मुसाफिर"नावाचा अभिनंदनीय लेख उपक्रमशील शिक्षक व्हाटसअप ग्रुप व ब्लॉगवर प्रसिद्ध केला होता.अनेकांना त्यांचे लेखन भावल्याने लेखी स्वरूपात शुभेच्छारुपी प्रतिक्रियादिल्या होत्या.सरांचे हे सर्व लेख पुस्तक स्वरूपात वाचायला मिळावे अशी आशा व्यक्त करुन सतत लेखनातून अभिव्यक्त होण्यासाठी शुभेच्छा देतो.🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
शब्दांकन श्री शिवाजी निकम सर क्रिडा समन्वयक महाबळेश्वर
Comments
Post a Comment