ग्रंथ आपले मित्र काव्य पुष्प-१३०



जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❗
📚ग्रंथ आपले मित्र📚

 छंद माझा आवडता वाचणं 
पुस्तक,पेपर,पत्रे,मासिकं
ग्रंथ वाचून ज्ञान मिळवणं
आजन्मभर विद्यार्थी रहाणं |

आनंदानुभव पुस्तकांच्या सहवासात
ग्रंथ आपल्याला ज्ञानी बनवितात
मग शब्दभांडाराची वाढते क्रेझ 
वाचल्यावर आपण होतो फ्रेश|

कर्तृत्वाच्या महतीसाठी चरित्रं वाचावे 
ज्ञान माहितीसाठी शब्दकोश वाचावे 
मनोरंजनासाठी कादंबरी काव्य वाचावे
ताज्या घडामोडीसाठी वर्तमानपत्र वाचावे |

पुस्तकाची अनमोलभेट देवूया  
वाचनसंस्कृतीला हातभार लावूया 
साहित्यकलेचे अवघे भांडार
वाचायला मिळती नानाविध प्रकार |

पुस्तक वाचण्याने मित्र जोडले 
लेखक कवी समीक्षक भेटले 
वाचनाने विचाराला चालना मिळाली
लेखनाची अभिरुची विकसित झाली| 

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
काव्य पुष्प -१३०



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड