पावसाचा रट्टा काव्य पुष्प-१३१
🌧️पावसाचा रट्टा🌧️
परतीच्या पावसानं
अक्षरशः रडवलं
पीक हातातलं
मातीमोल केलं ||
आकाशात मेघ गर्जत आले
वीजांचे तांडव सुरू झाले
चमचमाट लखलखाट झाले
परतीच्या पावसाने थैमान घातले ||
शिवारात पाणी साचलं
ऊस,भात मका ज्वारी
बाजरी भुईसपाट झाल्याने
पाऊस आता पोटाव मारी ||
हाता तोंडाशी
आलेला घास
वाया गेल्यानं
आवळला फास ||
चिंब भिजायला खुणवायच्या
आकाड सरावणातल्या जलधारा
बेफाम चिक्कार कोसळल्या
आश्विन मासातल्या धुवाॅधारा||
समदीकडे झालीय दैना
त्यामुळे वावराचा तलाव झाला
वरुणराजा आता तरी थांब
सततच्या वर्षावाने वैताग आला||
काव्य पुष्प -१३१
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment