झाडं वेलींचे दृश्य काव्य पुष्प-१२६




☘️ झाडं वेलींचे दृश्य☘️

दररोज  सायंकाळी
फिरण्याच्या वाटेवरी 
दररोज विसावतो 
पुलाच्या कठड्यावरी ❗

सहजच निवांत बसल्यावरी 
अचानक मागे वळून पाहिले 
सुंदर दृश्य तिन्हीसांजेला
 झाडाझुडुपांचे दिसले ❗

वडाची  बाकदार कमान 
खोडांची ऊंची एकसमान 
झुमकुळ्याचा पारंबीला मान 
कळकाची गुढी दिसे छान❗

नदी ओढ्याच्या काठी 
झाडं वेली  फोफावती 
किडं पाखरं निवासती
जैविक साखळी रक्षती ❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१२६

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड