औषधी वनस्पती काव्य पुष्प-१२४





🌱 औषधी वनस्पती🌱
सडकेवरुन जाताना 
या फळांकडे नजर वळे 
    झाडाला लगडली 
दुधीभोपळ्यासारखी फळे 🌳
उंच झाडाची गर्द छाया 
कमानीदार वाकल्या फांद्या 
वाटसरुला देते सावलीची माया 
नवल वाटे फळांचे समद्या 🌳
सौंदर्यप्रसाधनं करायला 
झाडाचा उपयोग 
वन्यप्राण्यांच्या खाद्याला
फळांचा उपयोग 🌳

दुतर्फा झाडांच्या ओळी 
सावलीचे छत्र देती 
परोपकाराचे दातृत्व 
झाड झुडपं दाखवती 🌳
जसे दिसते झुंबर लटकते  
वजनदार कंद वाऱ्याव डुलते 
हिंदीत बोलतात बालमखीरा 
अमृत संजीवनी उपयोग खरा ❗
(या फळाचे भारतात प्रचलित नांव फाणूस आहे.)

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१२४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड