पायऱ्यांची वाट काव्य पुष्प -१४५
🍁☘️पायऱ्यांची वाट ☘️🍁
पायथ्यापासून माथ्यापर्यंत
दगडी बांधिव पायऱ्यांची वाट
दुतर्फा हिरव्यागार झाडांच्या ओळीत
पानांच्या मांडवाने सजली पायवाट||
झाडाझुडपांची गर्द छाया
चालताना अंगावर लाभते
कधी चढाई कधी सपाटी
यमाई गडावर घेऊन जाते ||
चौथऱ्यावर निवांत बसूनी
शांतपणे क्षणभर विसावूनी
करुया परिसर न्याहाळणी
मनात करुया साठवणी ||
यमाई देवीच्या दर्शना जाऊया
साक्षात्कारी रुप मनोभावे पाहूया
शांत चित्ताने समाधान लाभते
भावभक्तीने प्रसन्नता मिळते||
काव्य पुष्प-१४५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
Click on https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment