वेलाचा मांडव काव्य पुष्प-१४२
वेलाचा मांडव सजलादारी
घराच्या अंगणी परसबाग
कोहळ्याचा वेल मांडवावरी
फळांफुलांनी लगडला बहरला
फळांचे तोरण सजले दारी |
फळे टपोरी गोलाकार
पांढरी रंगछटा देखणीफार
वेलीचवेली परसबागेत
वेलिंनी घेतले त्यांना कवेत |
हिरव्यागार पानापानात
वाढती उठावदार फळे
शेंगा आणि फळभाज्यांच्या
संग दिसे भाजीचे मळे |
भाज्यांचा उपयोग रसोईला
सात्त्विक आहार जेवायला
घरच्या भाजीची चव चाखायला
परसबाग फुलवा आपल्या घराला |
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१४२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment