गंधसुगंध काव्य पुष्प-१२७



🍂 गंधसुगंध 🍂
  गुलाब सोनचाफ्याचा 
सुवासिक गंध दरवळला 
टवटवीत गंधित फुलांनी 
शोभा आली तबकाला ||

गुलाब पुष्प प्रतिक प्रेमाचे 
एकमेकांना आनंद वाटते
चाफा जणू अत्तराची कुपी 
गंधसुगंध दरवळत ठेवते||

अग्रमानांकन गुलाबाला 
चाफ्याचा गंध दरवळला
फुलांची परडी देवपूजेला
गुच्छ माळा स्वागताला||

रंगगंधाची उधळण  करतात
मनाला तजेला देतात 
तोरणं  रांगोळ्या सजतात 
उत्सवाचा माहोल निर्मितात ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१२७
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड