ग्रामोफोन काव्य पुष्प-१५१
धांदिष्ठ्य मित्रांच्या मुशाफरीतील अकल्पित अवर्णणीय क्षण , "लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालय" पोसेवाडी खानापूर,येथील श्री भगवान जाधव यांच्या कडील ग्रामोफोन तबकडीवर ' हिमालय की गोदमे 'या सिनेमातील हिंदी गाणे "चाँद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था" ऐकल्यावर सुचलेले काव्य..
*ग्रामोफोन
मर्म बंधातील अनमोल चिजवस्तू
संग्राहक अवलियाने जपल्या
श्रवणीय गाण्याच्या झलकिने
गतकाळातल्या स्मृती जागल्या |
धनिकांच्या हवेलीत असलेला
आम्ही फक्त सिनेमात पाहिलेला
आज प्रत्यक्ष बघायला मिळाला
आणि आज आनंदीआनंद झाला|
लाईट वीना बॅटरी वीना सुरू होणारा
केवळ हॅण्डेलवर ग्रामोफोन चालणारा
अवीट गाण्याची मैफिल सजवणारा
गाणी ऐकून मंत्रमुग्ध करणारा|
तबकडीवर पीनचा ब्रश ठेवती
हॅण्डेल फिरवलाकी आवाज येती
पाहताना खरच अदभूत वाटती
गाणं ऐकताना देहभान हरती|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५१
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment