वृक्षाचा नजारा काव्य पुष्प-१५२
🌳वृक्षाचा नजारा🌴
गावाजवळील तलाव
शिगोशिग भरलेला दिसे
वृक्षाच्या फांद्यांचे
जलाशयात प्रतिबिंब दिसे ||
वाऱ्याच्या हालचालीने
पानांची नक्षी जलावर दिसे
पाण्यात बुडलेल्या खोडाचे
शेंडके झुपकेदार दिसे||
वाकलेल्या खोडाचे
मजेशीर रुप दिसले
त्याच्यावरुनी चालण्याचा
मोह मनाला भुरळ घाले ||
तोल सांभाळत खोडावरुनी
पटकन दोस्त पळत गेले
तयावर उभे राहूनी
दिमाखात चित्रबध्द झाले||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१५२
प्रतिक्रिया
आदरणीय सर
आपल्या काव्यरचनाला तोड नाही.
अप्रतिम अशी रचना.
कोणताही विषय असो, चित्र डोळ्यासमोर दिसल्यावर कमीत कमी सोळा ओळी तरी कवितांच्या झाल्या म्हणून समजायचं .
आपल्या लेखणीला सलाम..........🖋️🙏
श्री गणेश तांबे वाठार निंबाळकर फलटण
Comments
Post a Comment