दिवाळी पाडवा व भाऊबीज काव्य पुष्प-१४१






💫💥दिपावली शुभेच्छा
दिवाळी पाडवा व भाऊबीज

दिवाळी पाडवा आनंदाचा 
सणांचा राजा दीपोत्सवाचा 
सुवासिनींनी पतीला औक्षण्याचा  
पतीने पत्नीला भेटवस्तू देण्याचा||

नात्यांची जपणूक करुया 
स्नेहाचे  संवर्धन वाढवूया 
घर विद्युत रोषणाईने उजळूया
घरटं दिव्यांच्याआरासीने सजवूया ||

आतषबाजीच्या ठिणग्या 
आकाशी झेपावून उडती
आतषबाजीने आकाश उजाळती
रंगीत फुलदाणीचा पाऊस चमकती ||

नववर्ष म्हणून पूजन करती 
व्यापारी रोजमेळ वह्यांचे
देवादिकांना मनोभावे प्रार्थती
व्यवसाय वृद्धिच्या समृद्धीचे||

बहिणीची भावावर माया
मिळो त्याला प्रेमळ छाया
ताई दादाचा पवित्र सण
आनंदाने भरून आले मन||

मांगल्याचे नाते बहिण भावाचे 
लखलखती दीप जिव्हाळ्याचे
जपावे नातं निरामय भावनेने 
जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे
वाई काव्य पुष्प-१४१
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड