कवडसा तलावातला काव्य पुष्प-१४३
🔰कवडसा🔰
जलतरंगावर कवडसे पडले
आरश्यात मी निरखून पाहिले
छबी पाहूनी मस्तच वाटले
चेहऱ्यावरती हास्य उमटले ||
जलातल्या खोडावर उभा राहूनी
दोस्ताला फोटो काढायला सांगितला
अचंबित करणारे दृश्य पाहूनी
शिवसागर जलाशय आठवला||
खोड अन् फांद्या पाण्यात न्हाल्या
पानाफुलांच्या रांगोळ्या उमटल्या
झाडांनी पाण्यावर छत्र्या धरल्या
भटकंतीच्या उत्कंठा वाढवल्या ||
दोस्तांनी मारल्या उड्या
मस्तच तलाव हाय गड्या
मनमोहक तलाव परिसर
प्रसन्न ऊर्जेचा होई असर ||
काव्य पुष्प-१४३
१ नोव्हेंबर २०२०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
प्रतिक्रिया
प्रतिमा पाण्यातली,लटिंगे सरांच्या मनातली
श्री उध्दव निकम सर वाई
निसर्ग पर्यटक व फोटोग्राफर
Comments
Post a Comment