मनाचं भटकणं काव्य पुष्प-१३३
🍁🦋 मनाचं भटकणं🦋🍁
मन माझं होई पाखरु
स्वैर आकाशी संचारी
मन माझं होई लेकरु
खेळण्याचा हट्ट धरी
मन माझं होई कोकरु
अवखळ उड्या मारी
मन माझं होई शिंगरु
दुडक्या चालीने फिरी
मन माझं होई वासरू
अल्लडपणा करी
मन माझं होई फुलपाखरु
फुलांवर स्वच्छंद फिरी
मन माझे होई जलाशय
तरंगावर भाकऱ्या करी
मन माझं होई गार वारे
तनाला मोहित करी
मन माझं होई जलधारा
शिवाराला चिंब भिजवी
मन माझं होई जंगलवाटा
कड्याकपारीत फिरवी
मन माझं होई रानफुले
नाना रंगछटेचे उधळण करे
मन माझे होई तृणपाती
वाऱ्यासंग नाच करे
मन माझं होई अस्वस्थ
मग काही सुचत नाही
मग पावलं वळती निसर्गात
भ्रमंतीने थकवा दूर राही
काव्य पुष्प-१३३
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment