एक पणती दानाची काव्य पुष्प-१३९
🏮एक पणती दानाची🏮
समाजातील संवेदना जाणवूया
आपल्याच बांधवांना मदत करुया
समाजभान राखून खारीचा वाटा उचलूया
सामाजिक बांधिलकीचा दीप तेवत ठेवूया ||
वंचितांच्या दारी दीप लावूया
त्यांची दिवाळी साजरी करुया
नवचैतन्य मुखावर झळकू द्या
इतरांना हर्ष आनंद देवूया ||
पहाटेला सुरू दिवाळी सण
सुगंधी उटण्यानं करुया मार्जन
मोती साबणाने स्वच्छ झालं तन
गारगरम पाण्यानं होईल स्नान||
कुंकूमतिलक कपाळी लेवून
पंचारतीने करुया औक्षण
गरजूंना मदतीचा हात देवूया
आपलं दान सतपात्री करुया ......
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१३९
Comments
Post a Comment