दिवाळी कीट वाटप






 🏮एक दिवा सामाजिक बांधिलकीचा तेवत ठेवूया🏮
संवेदना जाणवूया ,आपल्याच बांधवांना मदत करुया |
समाजभान राखून खारीचा वाटा उचलूया |
 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  सामाजिक कार्य  करण्याची प्रेरणा देणारे आमचे मार्गदर्शकश्री एच.व्ही.जाधव साहेब,श्री कमलाकांत म्हेत्रे साहेब व श्री सुधीर महामुनी साहेब  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त " दिवाळी कीट " प्रत्यक्ष वाडीवस्तीवर जावून वाटप करण्याचे काम दरवर्षी केले आहे. समाजातील उपेक्षित व वंचित घटकातील कुटूंबियांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मदतीसाठी सदैव तयार असणाऱ्या शिक्षकमित्र परिवारातील मित्रांच्या वतीने वंचित घटकातील आपल्याच बांधवांची दिवाळी गोड होण्यासाठी या वर्षी  कातकरी समाजातील  २५ कुटूंबियांना ''दिवाळी कीट,व साडी" अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धोमधरण जलाशयाच्या काठावरील वाशिवली,कोंढावळे, उळुंब-बलकवडी व मालतपूर येथील वस्तीवर प्रत्यक्ष जावून साहित्य वाटप श्री सहदेव फणसे,श्री भास्कर पोतदार,श्री दिलीप जाधव,श्री रविंद्र लटिंगे आणि श्री सुनील जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदरचे दिवाळी कीट मधील साहित्य समावेशित शिक्षण प्रवाहातील विविध शाळांच्या मुलांनी तयार केलेले होते.या उपक्रमासाठी सढळहस्ते मदतीचा हात देणाऱ्या संवेदनशील समाजमनाच्या  शिक्षकमित्रांचे मनपुर्वक आभार....

🌹🏮सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗

प्रतिक्रिया 
खूप छान प्रेरणादायी 
       आपल्या जीवनातील प्रकाश इतरांच्या सुद्धा वाट्याला यावा .... दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसावा या सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या उपक्रमांचे खूप कौतुक 👍
श्री संतोष ढेबे, महाबळेश्वर 

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड