अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काव्य पुष्प-१४९
🖌️अष्टपैलू व्यक्तिमत्त्व🖋️
(श्री रमेश जावीर सर खरसुंडी ता.आटपाडी)
छांदिष्ट्य समूहाचे अवलिया
काठ्यशिल्पातून सिध्दले कर्तृत्व
दिलखुलासपणे सुसंवादती
विविधांगी पैलूंचे व्यक्तिमत्व |
आपला व्यासंग आयुष्यभर जपती
काष्ठ्यशिल्पातून हितगुज साधती
चित्र शिल्पातून संमोहित करती
संग्राहकवृत्तीची सिध्दता पटती |
वास्तवतेचे ज्वलंत अस्सल लेखन
होलिया वाजाप अन् सप्तरंगी कला
साहित्य आणि कला संग्रह दालनातून
भावभावनांचे माहेरघर भेटले आम्हाला |
चाणाक्ष नजरेने टिपलेल्या मुळखंडाला
पशुपक्ष्यांच्या काष्ठ्यशिल्पात आकारल्या
कर्तव्यभूमीच्या अनेक आठवणी
काष्ठ्य शिल्पातून मांडल्या|
खडतर संघर्षमय नव्यावाटेने
जीवन समृध्दीचा कलारंग
कला म्हणजे जीवन मानून
बनविला आयुष्याचा व्यासंग |
याभेटीने सरांचे समजले अंतरंग
कलेचे उलगडले बहुढंग
लाभली लोकप्रियता उदंड
कलेचा उपासक छंदात दंग|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१४९
या पुर्वाचे काव्य पुष्प व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment