सांजवेळ काव्य पुष्प-१४४

 



💥 सांजवेळ💫

शांत शीतल तिन्हीसांजच्या वेळी 

पश्चिमेला आभाळी लाली 

ढगांची लाल छटा माखली

अस्ताचा रवी आसमंत उजाळी||



बिंब विलोभनीय झळकले 

वृक्षराजीचे तोरण सजले 

शिवाय हिरवाईत रंगले

बहारदार पीक फुलले||


तेजोमय प्रकाश धूसर  होतो

पुन्हा नव्याने उभारी घेतो 

चराचरांना जैविकऊर्जा देतो  

हे भास्करा तुला प्रणामतो||


तिन्ही सांजेला रुप 

खुलते दिवाकराचे 

दिसभराच्या कामातून 

क्षणेक दृश्य बघण्याचे||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

काव्य पुष्प-१४४

यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.

Click on

https://raviprema.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड