मनपसंत थाळी काव्य पुष्प-१३४
🍲 मनपसंत थाळी 🍛
सामिष भोजनाची
मांसाहारी थाळी
मनपसंत जेवणाची
लज्जत वाढली |
झणझणीत तांबडा
गावरान रस्सा
मधीच फुरकायला
अळणी रस्सा |
चटकदार दमबिर्याणी
लाजवाब चवीची
कडक पापूड्याची
भाकरी चुलीवरची|
पाट्यावर वरवंट्याखाली
रगडून बनलेला मसाला
चुलीवर रटरठ शिजलेला रस्सा
भाकरी कुस्करून खाल्ला काला|
घरगुती जेवणाचा थाट
इथेच्छ भोजन घडविते
घरच्यांच्या हातच्या जेवणाची चव
कायमच् जिभेवर रेंगाळत राहते |
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१३४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment