दीपमाळा काव्य पुष्प-१४८
दीपमाळा
( सदर दीपमाळ श्री सिद्धनाथ मंदिर,खरसुंडी ता.आटपाडी येथील आहे)
श्रीसिध्दनाथ मंदिरा समोरी
नजरेत भरती सप्तक दीपमाळा
राऊळाचे सौंदर्य खुलविती
तेवणाऱ्या दीपस्तंभी माळा|
सण उत्सवात प्रकाशाच्या
तेवती तेजोमय माळा
शोभिवंत झळकला
पणत्यांचा गोतावळा|
एकावर एक दीप प्रज्वलले
त्याचा सोनेरी प्रकाशझोत
परिसर उजळून निघे
रातीच्या काळोखात |
प्रवेशद्वाराशी दीपमाळेचे दीपस्तंभ
देवदर्शनाचा झाला आरंभ
मनोभावे जाऊया राऊळात
खडीमुर्ती श्री सिध्दनाथाची देवळात|
काव्यपुष्प -१४८
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
click on
https://raviprema.blogspot.com
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment