दिवाळी फराळ काव्य पुष्प-१४०



🏮🏮🏮🏮🏮🏮🏮    
        दिवाळी फराळ
सण आला दिवाळीचा 
फराळोत्सवाच्या लगबगीचा 
साखरेच्या पाकात बुंदी भिजली
लाडू वळण्या एकत्र झाली ||

लाठलेल्या पातीत सारण भरुया
फिरकीने अलवार नक्षी काढूया 
मंद आचेवर करंजी तळूया 
खरपूस भाजून शीग लावूया||

पोह्याचा खमंग चिवडा केला
शेंगदाणे खोबरं डाळ तळली 
मोहरी लसणाची खमंग 
तडतड फोडणी घातली||

कडधान्यांचे पीठ घेतले 
तिखटमीठ घालून मळले 
शेवग्याने चकली बनवली
उकळत्या तेलात तळली ||

कुरकुरीत खमंग भाजली 
गरमागरम चवीनं खाल्ली   
अनारसे खसखशीने सजले 
कडकडीत गुळमाट झाले ||

घर आवलीने सजवूया 
अंगणी रांगोळी रेखाटूया 
गप्पांची मैफिल भरवूया 
फराळावर ताव मारुया ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१४०

Comments

  1. दिवाळीचा शाब्दिक फराळ मस्तच बंधू

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड