सण दिपावलीचा काव्य पुष्प-१३७





सर्व मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗ 

🍁🏮सण दिपावलीचा

सजला आकाशकंदील घराला
दिव्यांची रोषणाई घरदाराला
रांगोळी सजली अंगणाला 
फुलांपानांचे तोरण दाराला |

दारी लावला आशेचा दीप 
आसमंती झळकती कंदील 
उटणे लेऊन झालं अभ्यंग स्नान
नव्याने बांधला जरीचा मंदिल |

धनत्रयोदशीला पूजा धन्वंतरीची 
आरोग्यदायी निर्मळजीवनाची 
पूजा करुया धन-धान्याची 
घराला बरकत  मिळण्याची|

अभ्यंगस्नान नरक चतुर्दशीला
श्रवणीय गाणी ऐकू पहाटेला 
चैतन्याचे तेजोमय दीप लावूया 
विवेकदीप मनांमनात लावूया |

निराशेची तमा नाहिशी करुया 
सकारात्मक विचाराची कास धरुया 
खमंग फराळावर ताव मारुया
नवीन वस्त्रे परिधान करुया |

आश्विन अमावस्येला 
कुबेर लक्ष्मी पूजायला 
पंच पकवान्न नैवैद्याला 
लाह्या बत्तासे वाहायला|

काव्य पुष्प १३७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड