निसर्ग सहवास काव्य पुष्प-१२५




☘️ 🌿☘️🌿🌱🌿🌱    
        निसर्ग सहवास

भाळलो निसर्गाच्या रुपावरी
 जरा विसावू गवतावरी 
 आनंदाची घडती वारी 
सहवासाची गंमत खरी |

हिरव्यागार झाडांशी
वारं गंमत करतं
गवतावर उंडारणारी 
फुलपाखरं  दिसतं|

ढगाळ हवामान
हवेत उकाडा 
पावसाची रिमझिम
जलबिंदूचा सडा|

निसर्गाचा सहवास 
मनाला तजेलतो 
आनंदाच्या उकळ्या
मनात  फुटवतो|

हास्याच्या रुपात 
मैत्रीला दाद देतो
आनंदाचे क्षण
साजरे करतो|

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१२५
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड