शीतल सांज काव्य पुष्प-१५५
*शीतल सांज*
शांत सायंकाळी विलोभनीय बिंब
दिवाकराचे रुप नजर वेधते
ढगांना गुलालाची लाली
आकाशी उजळून दिसते ||
रवि किरणांचा तेजोमय प्रकाश
लाल सोनेरी रंग उधळतो
मनमोहक सूर्यास्ताचा देखावा
क्षणात नयनाने टिपतो ||
डोंगरमाथ्यावरुनी दिसे
मोहक रुप अस्ताचं
क्षितीजावरील निळसर छटेत
धूसर होत असल्याचं||
हे प्रभाकरा तुला नमितो
तेजोमय चेतनेची वाट पहातो
तुझ्या सौंदर्यासह पवनचक्की
अन् झाडवेलींचे दृश्य टिपतो||
काव्य पुष्प-१५५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment