भाजी मंडई काव्य पुष्प-१२९





🥦 भाजी मंडई 🍅
    भाजी घ्या भाजी 
   ताजी ताजी भाजी
काकडी घ्या काकडी 
हिरवी हिरवी काकडी ||

मुलांनी अंगणात बाजार मांडला
शेतातला भाजीपाला आणला 
रानातला हरभरा आणला 
परसबागेतला पापडी शेवगा आणला ||

मळ्यातल्या फळभाज्या आणल्या 
काहींनी कटलरी वस्तू आणल्या 
घरीच बनवले खारं शेंगदाणे 
चिक्की, लाडू बर्फी फुटाणे||

चाकवत मेथी कांदे बटाटे 
बोरं आणि चिंचेचे छोटे वाटे 
खरेदी करण्या धांदल उडाली 
पहिल्यांदा मुलांची भंबेरी झाली  ||

पालकांची गर्दी कोथिंबीर  कांद्याला 
तीन लिंबं पाच रुपयाला 
गावरान इंद्रायणी तांदूळाला
गर्दी झाली बघून घ्यायला ||

मुलं झाली विक्रेते 
पालक झाले घेवारी 
करु लागले खरेदी 
भेळ फरसाण पाणीपुरी||

व्यवहारज्ञानाची माहिती 
कृतीतून घेती अनुभूती 
शेजारच्या शाळा भेट देती
आवडता खाऊ विकत घेती ||

 सर सर भाजी घ्याना भाजी 
मुलांनी लडिवाळ विचारणा केली
फळे भाज्या खाऊ नाना 
तांदूळ लाडू  चिक्की घेतली ||

व्यवहारीक अनुभव म्हणून उपक्रम केला
पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला
महिन्यातून एकदा भरवाना मंडई
मस्तच होईल शाळेची नवलाई||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१२९

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड