तलाव क्षेत्र काव्य पुष्प-१४६
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
🍂तलाव क्षेत्र 🍂
दुष्काळी भागातील जलाचे साठे
निसर्गातील जीवजीवांचे पाणवठे
काठाकाठाने झुडपे वेढली
तवंगावर सावलीची नक्षी साधली ||
तळ्याच्या मधीच निष्पर्ण वृक्ष
समद्यांचे जाते त्याकडे लक्ष
क्षणभर होतं तरंगाकडे दुर्लक्ष
मनात येते भेट घेऊ प्रत्यक्ष ||
सभोवताली पवन ऊर्जेचे खांब
पांढऱ्याशुभ्र रेघा दिसती लांब
अवजड पाती वाऱ्यावर फिरती
गतीज ऊर्जेचे रुपांतर वीजेत होती ||
पाण्यावर भाकऱ्या खेळायला
मजेशीर गंमत वाटती
वाऱ्याच्या वेगे जलावर
नाजुकशा लहरी उसळती||
काव्य पुष्प-१४६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.click on
https://raviprema.blogspot.com
🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
Comments
Post a Comment