फुलांचे ताटवे काव्य पुष्प-१३२



फुलांचे ताटवे 

सायंकाळी फिरताना
कडेला ताटवे  दिसले 
गर्द तांबडे गुलदस्ते 
नजरेत भरु लागले 🌸

अडगळीच्या गचपनाला
सुमने शोभिवंत करती 
गवतफुलांच्या झाडातून 
गेंददार फुले उसळती  🦋

तांबड्या  सुमनांची नक्षी 
हिरवाईच्या चटईवरती 
सणवारांचे करण्या स्वागत 
त-हेत-हेचे रंग उधळती 🌸

हर्ष आनंदाची प्रतिक फुले
निसर्गसृष्टी  सजविती 
गंध सुगंध रंग देवूनी 
माला गुच्छ तोरणं लगडती 🍁
काव्य पुष्प-१३२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड