दिपावली काव्य पुष्प-१३६




दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗ 
🏮💥💫💫💥🏮
          दिपावली
प्रकाशाचे पूजन करणारी 
पणत्यांनी घर उजळवणारी 
रंगांची उधळण करणारी 
नात्यांची जपणूक करणारी ||

अमाप उत्साह वर्धित करणारी 
आनंद द्विगुणित करणारी 
नवचैतन्याची ऊर्जा देणारी 
रांगोळ्यांच्या नक्षीने सजणारी ||

 रित्या ओंजळीत दान देणारी 
सुखसमृद्धीची उधळण करणारी 
आकाशी कंदील प्रज्वलित करणारी 
आसमंत उजळून टाकणारी ||

फराळोत्सवाने स्नेह वाढविणारी 
नव्या वस्त्रांनी रुप खुलविणारी 
नातेसंबंधाची जपणूक करणारी 
स्नेह अन्  मैत्री संचित करणारी||

आपली समृद्धी द्विगुणित करणारी
अन् इतरांना आनंद सुख  वाटणारी 
समाजभान राखून सहकार्य करणारी 
एक पणती सतत तेवत ठेवणारी ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे
वाई काव्य पुष्प-१३६

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड