बहारदार वृक्षराज काव्य पुष्प-१२८




बहारदार वृक्षराज

डेरेदार वृक्षराज पाहुनी 
तनमन प्रसन्न झाले.
झाडाच्या पारावर बसूनी
गप्पांचे इमले मनी आले |

सूरपारंब्या झाडावरच्या
खेळताना मजा यायची 
कैरी चिंचा बोरं पाडताना 
जिवलगांची साथ मिळायची |

वृक्षराजी परोपकार करती 
फळं फुलं काष्ठ पानं वाटती 
निसर्ग सौंदर्याने रुप सजती 
दृश्यमानाने मन रिझती |

वृक्षराजी वनसंपदा निसर्गाची 
थंडगार वारा छाया मायेची
पीकं कसदार थोरवी रानाची
भरलेल्या सुवासिक ओंब्यांची|
काव्य पुष्प-१२८

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
फोटो साभार श्री राजेन्द्र बोबडे

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड