वसुबारस काव्य पुष्प -१३५
🐂 वसुबारस
गोधनाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...
गाय आणि वासराच्या अंगी असणारी वात्सल्य, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी आपल्यास लाभो....
वसुबारस
गाईचा गोऱ्या
शेतकऱ्याचे धन
बारशीला करा
गाईचे पूजन||
फुलमाळा घालून
ओवाळणी करूया
कृतज्ञतेने सन्मानित
गोधन करुया ||
कृषकांचा सुदिन
गोधनाला समर्पित
उपकाराच्या जाणिवाने
हर्षोल्हासाने अर्पित||
बाजरीची भाकरी
गवारीची भाजी
नैवेद्यंम समर्पयामि
वाद्यांचा गजर वाजी||
गाय वासरू
समृद्धीचे प्रतिक
प्राणीमात्रांचे
करुया कवतिक||
दिवाळी सणाची
झालिया सुरुवात
सुखसमाधानाची
होऊद्या भरभराट ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१३५
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment