माळाचं सौंदर्य काव्य पुष्प-१४७
🌿माळरानाचं सौंदर्य
अनिलाच्या झोतावरी
भिरभिरणारी पाती
वाऱ्याचं गाणी गाती
ऊर्जेची साठवण करती ||
टेकडीच्या माथ्यावर
विणले जाळे पवनचक्क्यांचे
अपारंपारिक ऊर्जा स्रोत
बनले हुकमी एक्क्यांचे ||
वेगळी वाट तुडवत
टेकडीवर जाऊया
माळावरच्या तृणांतल्या
कुसळांची अग्रे निरखूया||
माळरानावरल्या गवतावरती
अंग झोकूनी जरा विसावलो
तलावातले जल पाहूनी
मनातल्या मनात चिंब भिजलो||
आम्ही फिरस्ते सह्याद्रीच्या कुशीतले
माणदेशीच्या भटकंतीला निघाले
वाटेतल्या दृश्य स्थळांनी मोहिनी घातली
सौंदर्यांची टिपणं चित्रबद्ध केली ||
काव्य पुष्प १४७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment