महात्मा ज्योतिबा फुले काव्य पुष्प -१५३




विनम्र अभिवादन 
       महात्मा ज्योतिबा फुले 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 
समाधीचा जीर्णोद्धार करणारे  
छत्रपतींच्या इतिहासाचा पोवाडा लिहिणारे   
जातिभेदाला मूठमाती देणारे||

सामाजिक क्रांतिला 
घरापासून सुरुवात करणारे 
ज्ञानाची ज्योत पेटवून 
पत्नीला शिक्षिका करणारे ||

बहुजनांच्या शिक्षणासाठी 
ज्ञानाची कवाडे खुली केली 
मुलींच्या शिक्षणासाठी 
पुण्यात शाळा सुरू केली ||

समतेचा विचार आचरणात जोपासणारे 
बहुजन समाजाचे महात्मा खरे
 पिण्याच्या पाण्यासाठी 
 हौद खुला करणारे  
पुरोगामी विचारधारा पेरणारे||

साहित्यातून वास्तव लेखन करणारे 
शेतकऱ्यांचा आसूड मध्ये 
शेतकरी जीवन व्यक्त करणारे
सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे ||

स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे 
उच्चवर्णियांची मक्तेदारी मोडीत काढणारे
क्रांतिसूर्य थोर समाजसुधारक 
सामाजिक बांधिलकी जपणारे ||

काव्य पुष्प-१५३ 

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड