महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव काव्य पुष्प-१५०





    विनम्र अभिवादन 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार 
राजकीय धुरंदर राष्ट्रीय लोकनेते 
ज्ञानोपासक ,सुसंस्कृत व्यक्तिमत्व 
पंचायत राज व सहकार जाणते ❗

आदरणीय यशवंतरावजी चव्हाण
साहेबांच्या कार्यपटलाची थोर किर्ती
 पाहुनी समाधी स्मारक स्मृतीस्थळी 
समस्त जन ,अभिवादना हस्त जोडती ❗

'कृष्णाकाठ'आत्मचरित्रातील 
जीवनातील अक्षरशिल्पे आठवूया 
यशवंत विचारांचा वारसा घेऊन
आपण समतेचे पाईक होऊया ❗

सह्याद्रीच्या छाव्याचे हिमालया सारखे 
उत्तुंग व्यक्तिमत्व सर्वांना कळले 
कृष्णा कोयनेच्या प्रितिसंगमा वरती  
कार्यकर्तृत्वाचा सुगंध दरवळे ❗

काव्य पुष्प-१५०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड