कोजागिरी पौर्णिमा काव्य पुष्प-१२२
🌝💫🌝💫🌝💫
कोजागिरी पौर्णिमा
धानाच्या ओंब्यांची तोरणं बांधूया
कोजागिरी पौर्णिमेला नवान्न पुजूया
मित्र कुटूंबासवे शांत स्थळी जाऊया
नभीचं तारांगण मनसोक्त पाहूया❗
मसाला दूध केशर बदाम चारोळीचे
चंद्राच्या प्रकाशात मंदाग्नीवर आटवूया
कढईतल्या दुधात दिसते प्रतिबिंब चंद्राचे
नयनमनोहरी दृश्य मनात साठवूया ❗
आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊया
गाणी गप्पागोष्टींची मैफिल सजवूया
रात्रीचं शीतल चांदणं मनभरुन पाहूया
शुभ्रधवल चांदण्यात न्हावून जावूया ❗
मसाला दूध प्राशन करीत
मजेत पुनव साजरी करुया
शांत शीतल रुपेरी प्रकाशात
शरदाचं पिठूर चांदणं पाहूया ❗
मसाला दुधाचा आस्वाद घेऊनी
कोजागिरीला जागरण करूया
गुलाबी थंडीची चाहूल जाणूनी
आनंदाच्या दिवाळीची वाट पाहूया ❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१२२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
अप्रतिम सर
ReplyDeleteकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर#
धन्यवाद सर
ReplyDeleteKhoop Chhan
ReplyDelete