निसर्ग सौंदर्य कर्दळी कविता १०७




निसर्ग सौंदर्य 
ढगाळ हवा सांजवेळी 
आभाळी मेघांची नक्षी 
दिसे दृश्य मुक्त चित्रांचे
नजर वेधणारे पशुपक्षी ||

झाडांची हिरवाई 
पानोपानी सजली 
मधीच सोनेरी रंगात 
कर्दळीची फुले बहरली ||

निसर्गाची किमया न्यारी 
मुक्तपणे रंग ओसंडले 
सृष्टीचे रुप नव्या 
साज सुगंधाने बहरले ||

डोंगराच्या कडेकपारी
प्रपात ओहळ गाती गाणी
पानाफुलातून नाद घुमे
सुसाट मंद वाऱ्याची वाणी||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १०७
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड