दुर्गात्सव काव्य पुष्प ११३




नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗
देवीच्या चरणी शतशः नमो नमः
दुर्गात्सव 
उत्सव नवदुर्गेचा 
जागर स्त्रीशक्तीचा 
गौरव यशोगाथेचा 
मान आत्मसन्मानाचा❗

एकेक माळ बांधूया
 शक्तीची पूजा करुया
एकेक दीप प्रज्वलूया 
चेतनेचा आनंद उजाळूया❗

एकेक कवन गाऊया
देवीचा जागर घालूया 
एकेक रुपाची पूजा बांधूया 
मनोभावे देवीची उपासना करुया ❗

वाजती संबळ साथ तुनतुन्याची 
गोंधळ सजे बाय चाल गाण्याची
वाद्यांचा गजर आला कानी 
एकमुखाने करुया जयघोष वाणी ❗
काव्य पुष्प ११३
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड