हिरवाई बाग काव्य पुष्प ११८




        हिरवाई 
काबाडकष्ट करून 
शिवार फुलवले 
घामाच्या धारांचे
अत्तर शिंपडले ❗
मातीचा टिळा कपाळी लावला
मायेचा ओलावा स्पर्शून गेला
झाडांना फुले फळे बहरली
शेती गर्द हिरवाईने नटली ❗
जलाने केले सिंचन 
कष्टाचे केले शिंपण 
शेतकऱ्यांचे हेच वतन
त्यांना बनवते सधन ❗
पपया पेरुत साखर पेरणी 
(फळांच्या होतील मग ऐरणी )
  घोसदार फळे दिसती रानी 
खिशात खुळखुळतील नाणी 
बागायतदार होईल समाधानी❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प११८
फोटो साभार श्री गणेश तांबे सर 
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
@@प्रतिक्रिया...

शेतकरी जगाचा पोशिंदा शेतात सतत राबत असतो.घाम गाळून पीक काढतो आणि सर्वांना पुरवतो .कवी रवींद्र लटींगे यांनी शेतकरी जीवन या काव्यात मांडले आहे खूप सुंदर कविता धन्यवाद!
श्री रमेश जावीर सर  काठ्ष्य शिल्पकार खरसुंडी 

आदरणीय सर
 मनापासून आभार 
आपल्या रानातील विविध फळबागांचा फोटो जतन करून त्यावर केलेली कविता मनापासून आवडली
 ही सर्व शेतकरी वर्गांसाठी प्रेरणादायी आहे....
श्री गणेश तांबे सर अध्यक्ष आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर फलटण 

🍃🌿☘️🍀🍀🌴🌴🌱🌱🌳

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड