शेतातला फुलोरा काव्य पुष्प १२०
🌱☘️ शेतातला फुलोरा ☘️🌱
गगनी काळेभोर मेघ दाटले
कुंद हवेने वातावरण भरले
वाऱ्याची झुळूक अबोल झाली
तनमनाची लाही लाही झाली ❗
गर्द हिरव्यागार रानोरानी
पाखरांची गुंज येते कानी
शिवार बहरलय पिकांनी
तुरीच्या पिवळ्या फुलांनी ❗
फुलोऱ्याच्या फांद्या सरळ
त्यावर लगडली नाजुक फुले
पिवळ्या रंगाच्या टिकल्या शोभती
फुलदाणीतली शोभिवंत फुले❗
ऊस,केळीची बागायती शेती
शेतकरी जपतो निसर्ग नाती
कडधान्य अन् भिमूग फुलती
शेतकऱ्यांचे कष्ट रानात दिसती❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १२०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment