काव्य पुष्प घटस्थापना १०९
ओझर्डे ग्रामनिवासिनी ग्रामदैवत श्री पदमावती देवी ..
सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗
(घटस्थापना)
मातृशक्तीची पूजा करुया
चेतना उर्जा मिळवूया
व्रत उपवासाचे धरुया
घराला सुखशांती मिळवूया |
मातृशक्ती भक्तीचा उत्सव आला
चला देवघरात घट स्थापूया
कुलदेवतेचे आर्जव पूजनाला
घटाच्या वावरीत धान पेरुया |
पिवळ्या रंगाच्या पुष्पमाला
घटाला मनोभावे अर्पण करुया
सुखसमृद्धीचा सण हा आला
मनोभावे उपासना चला करुया |
चैतन्याचा नंदादीप तेवत ठेवूया
तमसाची काजळी झटकूया
दुर्गादेवीचे नामस्मरण करुया
लोककलांचा जागर घालूया|
काव्य पुष्प १०९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
आमचे ग्रामदैवत
ReplyDeleteसुंदर कविता
ReplyDelete