माझी भटकंती नागपूर ११३




☘️🔆☘️🔆☘️🔆☘️🔆
माझी भटकंती
   भाग क्रमांक -११३
 धार्मिक तिर्थक्षेत्र सहल
सन २००० पाचवा दिवस
   🍁नागपूर अधिवेशन
〰️💫〰️💫〰️💫〰️💫
सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे नित्यकर्मे उरकून तयार झालो.ज्यामुळं धार्मिक यात्रा घडत होती.तो  प्राथमिक शिक्षक संघाचा त्रैवार्षिक अधिवेशन सोहळा रेशीमबाग मैदानावर संपन्न होणार होता.खास त्यासाठीच हा सगळा प्रवासप्रपंच केला होता.सकाळी हेवी नाष्टा आणि चहापान करून आम्ही अधिवेशन स्थळी पोहोचलो.गाडी पार्किंग मध्ये लावली.मंडपाच्या अवतीभोवती पुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्रीचे स्टॉल उभारले होते.त्यांचीही पहाणी करत अवलोकन करत होतो.उपक्रमशील शिक्षकांनी बनविलेले साहित्य दृष्टिला पडत होते.त्यापैकी अध्यापनासाठी बनविण्याच्या नवकल्पना लक्षात येत होत्या.मुलांसाठी स्वाध्यायमाला व सुविचार संग्रह पुस्तक अधिवेशनाची आठवण म्हणून खरेदी केले. आणि सभेच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेशलो.प्रशस्त मंडप, अवाढव्य व्यासपीठ बनविले होते.शिक्षकांचे आगमन व्हायला सुरुवात झाली होती.निवेदकाने  गरजेनुसार केलेल्या सूचना ऐकू येत होत्या.प्राथमिक शिक्षकांचे नेते श्री शिवाजीराव पाटील आण्णा यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन उपस्थित रहाण्यासाठी महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांध्यापर्यत आणि पालघर पासून सोलापूर पर्यंतचे प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.सुमारे दोन तासांनी मंडप गर्दीने भरला.यावरुन शिक्षकांनी उपस्थित राहून विश्वास सार्थ ठरविलेला दिसून आला. मुख्य सभेला सुरुवात झाली.मान्यवरांना शिक्षकांच्या न्याय्य व  हक्कांच्या मागणीचे निवेदन दिले.उपस्थित माननीय मान्यवरांनी आपापल्या भाषणातून प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.न्याय्य मागण्या मंजुर करण्याचे आश्वासन दिले.राज्यशिक्षक संघाच्या नेतेपदी आण्णांची निवड आणि राज्य कार्यकारिणीची घोषणा  करण्यात आली.त्यास टाळ्यांच्या कडकडाटात तमाम प्राथमिक शिक्षकांनी मान्यता दिली.'शिक्षक संघाचा विजय असो,' "शिवाजीराव पाटलांचा विजय असो,'' 'शिक्षक संघ कामात दंग ' अशा उत्साहाच्या भरात दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.हळूहळू वाट काढत आता आम्ही अधिवेशन स्थळापासून आमच्या गाडीजवळ आलो.उनाचा चटका चांगलाच बसत होता.लाही लाही झाली होती.लिंबू-पाणी पिलो.आईसस्क्रीम खाल्ल्यावर जरा बरं वाटलं.केळी आणि इतर फळांचा आस्वाद गाडीजवळ  घेतला.भूक लागली होती . फळं खाल्ल्यावर जरा आधार मिळाला.गाडीवरचं साहित्य व्यवस्थित असल्याची खात्री केली.सगळे आल्याची खात्री झाल्यावर आम्ही रामटेक कडे निघालो.पुढे वाटेतच रस्त्याच्या दुतर्फा संत्रीचे मोठाले ढीगच्या ढीग दिसत होते.ते पाहून दाजींनी एका ठिकाणी गाडी थांबवली.रसरसित,पिवळी धमक आणि टपोरी संत्री दिसत होती.सॅम्पल खाल्ल्यावर चवीला आंबट गोड लागत होती.डझनावर विक्री होती.दोन किंवा तीन डझनाचे बॉक्स करुन देत होते.आम्ही दोन-दोन डझनाचे प्रत्येकी दोन असे दहा बॉक्स घेतले.गाडीच्या सीटखाली अलगद ठेवले.इतरांना खायला  संत्री  देवून आमची गाडी .
रामटेक कडे मार्गस्थ झाली.

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
भाग क्रमांक ११३
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड