व्याख्यानमाला व्याख्याते हायलाईटस्
ऑनलाईन विचारप्रबोधन माला पंचायत समिती महाबळेश्वर व छंदिष्ट समुह.
हायलाईटस्
🌿🌴🌿🌴🌳☘️🌱
आदरणीय श्रीमान चंद्रकांत पवार सरांनी
व्याख्यानमालेचे पुष्प पहिले गुंफले
सुंदर जगण्यासाठी काय करावे बरे
याचे मनमोकळ्या गप्पात हितगुज साधले |
कर्णमधूर शब्दांनी विषय भावला
पुस्तक प्रकाशनाचा आवाका समजला
नव शब्दप्रभुंचे प्रेरणास्रोत गुरुजी आहे
सेवानिवृत्ती नंतरही लेखनात सजगता आहे|
____________📚✒️🗞️📚📖✒️🗞️
व्याख्यानमालेचे दुसरे ज्ञानपुष्प गुंफले
श्रीमान मनोहर भोसले मनुदांनी
लेखन प्रवासाचा उलगडा केला
रसाळ ओघवत्या शैलीत पत्रकार मित्रानी|
संवेदनशील पाठाचे लेखकमित्र भेटले
आनंदाला पारावार नाही उरले
व्यवहारीक जीवनानुभव इत्यंभूत टिपले
त्याचेच चित्रण शब्दात उतरविले|
################
🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सजले
श्री महादेव लांडगे सरांच्या सेवा कर्तृत्वाचे
कोणताही अभिनिवेश न बाळगता
संवेदनशील मनाच्या मनोयात्रेचे |
आयुष्यातील टर्निंग पॉइंट
व्याख्यान श्रवणाने होतो
समाजाचे देणं म्हणून
वृद्धाश्रमाच्या सेवेत रमतो |
🦇🐒🕷️🐆🦚🌴🌳🌱☘️🦀🐍
वनाधिकारी श्री महेश झांजुर्णे साहेबांनी
व्याख्यानमालेचे चतुर्थ पुष्प खुलविले
वनविश्वातील सिध्द अनुभव कथन केले
जंगल सफारीचे कुतूहल वाढविले |
आशयघन शब्दात संवाद साधला
दृष्टीतला अद्भूत प्राणीविश्व समजवला
अभयअरण्याची ओळख नव्याने झाली
निसर्गातील जैविक साखळी कळली ||
शुद्ध हवा जंगलची
प्रदुषणमुक्त असते
ऑक्सिजनचे महत्त्व
लाॅकडाऊनने कळते ||
🩺💊💉🩺💊💉🩺💊
धन्वंतरी श्री प्रदीपजी भोसले सरांनी
दिलखुलासपणे सोप्या भाषेत उद् बोधन केले
शारदिय व्याख्यानमालेच्या पाचव्या पुष्पात
आरोग्यादायी विचार व्यक्त केले ||
कोरोना काळात कशी घ्यावी
निरामय आरोग्याची काळजी
आहार विहार आचार करुनी
श्वसनाचे प्राणायाम करा गुरुजी||
वैज्ञानिक दृष्टिने कोरानाची भिती घालवली
प्रतिबंध उपायांची सूची दिली
श्रोत्यांच्या प्रश्र्नांची उत्तरे दिली
विषाणूच्या संसर्गाची माहिती दिली||
लक्षणे दिसताच टेस्ट करा
आॅक्सिजन पातळी चेक करा
प्रतिकार शक्तीची वाढ करा
गरजेच्या व्यायामाची कास धरा||
📚📖📚📖📚📖📚
पत्रकार शिक्षकमित्र श्री सुनील शेडगे सर
आप्पांनी व्याख्यानमालेत षट्कार मारला
वाचन संस्कृतीचा वाचक बहरला
काय वाचावे?काय वेचावे ? या विषय प्रस्तुतीने अवघा रसिक मंत्रमुग्ध झाला अमोघ वाणीने ||
महापुरुषांच्या कार्याची ओळख
चरित्रे वाचून समजते उमगते
मनापासून पुस्तक वाचल्याने
पुस्तक आनंदानुभव देते ||
सुंदर विचारांची आशयघन गुंफण
प्रतिभावंत लेखकांचे वैचारिक शब्दधन
सकाळ वृत्तपत्रात सजग लेखन
व्यासंग जपलाय पुस्तक वाचन ||
पुस्तकप्रेमी महामानवांचे कर्तृत्व गौरविले
किस्से खुलविले,उदाहरण फुलविले
कथा गोष्टीतून उद् बोधन केले
व्याख्यानातून काय वेचावे समजले||
✒️🎙️📖🗞️🎤✒️🗞️
निवेदक पत्रकार श्रीमान विठ्ठल माने सरांनी
व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफले
व्यक्तीमत्त्व विकासातील विविध पैलूंचे
मधूर वाणीने विचार व्यक्त केले ||
समयसूचक कवन अन् विचारधन पेरत
विशेष गुणांच्या उपमांनी आणली रंगत
यशसिध्दी आत्मविश्वासाने मिळते
स्व: विकासासाठी व्यक्त होणं कळते||
अनुभव संपन्न शब्दसामर्थ्य
वाणीच्या संस्कारातून उमगले
समर्पक शब्दांचे सौदागर
सुसंवादाने व्याखान रंगले ||
🏅🏆🥈🏃🏻♀️🏑🏒🚴🏼♀️
विचार प्रबोधनमालेची सांगता
आरोग्य आणि खेळाने झाली
कोच श्री राजगुरू कोचळे सरांनी
प्रस्तुती स्वानुभवाने केली |
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अन् अॅथलिट
मॅरेथॉन संयोजक असे वक्ते लाभले
आरोग्यदायी लाभाने उर्जा मिळाली
खेळाचे कौशल्य अन् आहाराचे गमक समजले|
जो फिट तोच होईल हिट
यासाठी बैठक घालूया नीट
खेळाचा प्रचार व प्रसार झाला
आवडीचा खेळ मजेत रंगला |
📚📖📚📖📚📖📚
पंचायत समिती महाबळेश्वर व छंदिष्ट समुह यांचे मनःपूर्वक आभार. सर्व व्याख्याते ,अक्षरप्रभू, गुरुबंधू संयोजक,आयोजक,निवेदक,प्रास्ताविक कर्ते, परिचय कर्ते,आभार कर्ते,तंत्रज्ञ,रसिक श्रोते आणि या विचार प्रबोधन व्याख्यान मालेचे प्रेरणादायी मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी श्री आनंदजी पळसे साहेब व प्रधान संयोजक प्रेरणास्रोत केंद्रप्रमुख श्री दीपकजीदीपकजी सर या सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद❗
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment