नवरात्र उत्सव ११६




* दुर्गात्सव  *
नवरात्र उत्सव 
काबाडकष्टाने उच्चशिक्षित झाली 
ध्येयासाठी परिस्थितीशी झगडली 
जिद्दीच्या बळावर यशस्वी झाली 
संघर्षाची सुखात परिणिती झाली 
हीच खरी नवदुर्गा  .......

कोवीड काळीआत्मभान ठायी 
सेवाभावी वृत्तीने कार्यरत राही 
परिचारिका सेवाव्रती ताई   
अन् समस्त डॉक्टर माई
ह्याच खऱ्या नवदुर्गा ........

रस्ते चौक बाजार दवाखाने  
या ठिकाणी ड्युटी बजावली
कसं वागावं याची जनतेला 
पोलिसताईंनी सवय लावली 
त्या खऱ्या नवदुर्गा ....

नगर शहरांचे आरोग्य रक्षती 
रस्ते बागांची स्वच्छता करती   
स्वच्छतेचे दूत खरे कर्मचारी
स्वच्छतेचा मूलमंत्र जोपासती 
त्याच खऱ्याखुऱ्या दुर्गा......

कोवीड लाॅकडाऊनच्या काळात 
पर्वा न करता वाऱ्या पावसाची  
शेतात राबणाऱ्या मातांची 
धान पिकविणाऱ्या माऊलींची
त्या खऱ्याखुऱ्या दुर्गा  .....

लाॅकडाऊन असो वा नसो 
घरात राबणाऱ्या माता भगिनी 
कुटूंबाच्या मदतीला न थकता 
सतत धावणाऱ्या घर कारभारनी 
याच खऱ्याखुऱ्या दुर्गा...

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
काव्य पुष्प ११६

 महिला सबलीकरणात सक्षमपणे "स्त्रीशक्तीचा जागर"  करणाऱ्या सर्व माता भगिनी आणि महिलांच्या गौरवशाली कार्यास त्रिवार वंदन आणि सलाम!!!!

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड