माझी भटकंती वर्धा आश्रम ते नागपूर




  





   माझी भटकंती
भाग क्रमांक-११२
धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन २००० चौथा दिवस

     सेवाग्राम व पवनार आश्रम वर्धा
दुपारच्या दरम्यान आम्ही वर्धा येथे पोहोचलो.चौकशी करत करत
सेवाग्राम आश्रमला पोहोचलो.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.सन १९३६ साली बापू येथे आले होते.बऱ्याच काळ त्यांचे वास्तव्य येथे होते.सेवाग्राम आश्रमातूनच देशाच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळ सुरू झालेली होती.हा शांत आणि रमणीय परिसर आहे.स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार 'सेवाग्राम ' आश्रम आहे.इथं बापूजींची अनेकस्मृती चिन्ह आहेत.त्यांचे उपयोगी साहित्य बघायला मिळाले.बापू कुटी,बा कुटी,महादेव कुटी इत्यादी ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे.
आश्रमाच्या जवळच चित्र प्रदर्शन आहे.महात्मा गाधींचा संपूर्ण जीवनपट  चित्राद्वारे पहायला मिळाला.इथं चरखा असून त्यावर सूतकताई केली जाते.भारत छोडो आंदोलनाची सभा येथेच संपन्न झाली होती.अशा महान आश्रमास अभिवादन केले..अशी ठिकाणं बघितली की आपल्या देशाच्या इतिहासाच्या माहितीचा उजाळा मिळतो. प्रासंगिक घडामोडींची प्रदर्शनरुपी चित्रातून माहिती मिळते.
        तद्नंतर आम्ही निसर्गरम्य परिसरात धाम नदीच्या काठावर असलेला आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या 'पवनार' आश्रमाला भेट द्यायला निघालो.विनोबाजींच्या मानवतावादी आणि सर्वोदय कार्याची इतरांना प्रेरणा देणारा साक्षीदार.. पदयात्रा आणि भूदान चळवळ रुजविण्यासाठी केलेल्या कार्याचा स्तंभालेख दाखविणारा आश्रम . शेतीतील सर्व कामे माणसांनी  करावे यासाठी केलेल्या 'ऋषीशेती'  कृतीशील प्रयोग  राबविलेले स्थळ बघितल्यावर आपल्याला स्वावलंबन आणि स्वदेश क्रांतीची महती समजते. आश्रमाला आम्ही विनम्र अभिवादन करून तेथील स्मृतींना हृदयाच्या गाभाऱ्यात साठवत पुढील प्रवासाला निघालो.आपल्या कृतीतून सद्विचार,संस्काराची शिदोरी सामान्य लोकांना देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांना त्रिवार वंदन अन् अभिवादन..
         आता आमचा प्रवास नागपूर कडे सुरू झाला होता.अंदाजे अंतर ८० किमी म्हणजे तीन एक तासांच्या प्रवासानंतर आम्ही महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपूरला पोहोचणार होतो..प्रवासातच एका बऱ्यापैकी धाब्यावर मस्तपैकी आवडीच्या व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या डिशेसची ऑडर दिली.वेटरने जेवण वाढल्यावर मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला.यथेच्छ भरपेट जेवण झाले.जवळच्या पंपावर गाडीत इंधन भरले.घरी एसटीडी बुथवरील फोनवरून संपर्क साधला. घरची खुशाली विचारली आणि आम्ही कुठं आहोत याची माहिती दिली.
    तदनंतर आम्ही नागपूर कडे प्रस्थान केले..सेलू,जामठा करत करत सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही नागपूरला पोहोचलो.लाॅजिंगची चौकशी करत फिरत  होतो.बऱ्याच ठिकाणी बुकिंग फुल्ल आढळत होते.
आम्ही फिरत फिरत दवाई चौकात आलो होतो.तिथं निवासाची चौकशी करत असता एक धर्मशाळा दिसली.तिथं आम्ही गेलो.विचारणा केली..त्याने अल्पकिंमतीत माडीवरील कॉमनरुम दि
मिळाली.माडीला जिना लाकडी आणि जमीन कडीपाटणी केलेली होती.स्वच्छतेची सोय छानपैकी होती.साहित्य घेऊन रुममध्ये गेलो.फ्रेश होऊन शहर फिरायला व खरेदीला बाहेर पडलो.बऱ्याच शिक्षकांच्या गाड्या दिसत होत्या.. बाजारपेठेत गरजेची खरेदी केली.एका हॉटेलमध्ये  सावजी जेवणाचा आस्वाद मनसोक्त आस्वाद घेतला.आणि धर्मशाळेत आलो.. उद्याचं अधिवेशन, फिरणं आणि परतीचा प्रवास यांवर चर्चा केली.तदनंतर विश्रांती घेतली.शुभ रात्री.
भेटूया उद्या धार्मिक तीर्थक्षेत्री रामटेकला तोपर्यंत नमस्कार
भाग क्रमांक ११२

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com



.

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड