माझी भटकंती पन्हाळगड भाग क्रमांक--१२२




☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🍂
साठवणीतल्या आठवणी
      माझी भटकंती 
कौटुंबिक सहल 
🍁पन्हाळगड  🌻☘️
भाग क्रमांक-- १२२
दिनांक १३ नोव्हेंबर २०१८
➖➖➖➖➖➖➖
        पूर्वरंग
कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मातेचे देवदर्शन करून आमची गाडी २० किलोमीटरवर असलेल्या किल्ले पन्हाळगडाकडे निघाली होती. शहरापासून आम्ही रत्नागिरी रस्त्याने निघालो होतो.दुतर्फा उसाची बागायती शेती नजरेत भरत होती.
कोल्हापूर म्हणजे गुळ आणि साखरेची नामांकित बाजारपेठ..
  छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारातून साकार झालेलं राधानगरी धरण ,पंचगंगेचा परिसर  आणि ओढे नाले व छोट्या नद्यांवरील  के.टी.वेअर बंधाऱ्यामुळे  सुजलाम सुफलाम शेती सर्वत्र  दिसत होती. कोल्हापूरची खासियत असणाऱ्या सामिष जेवणाची हॉटेल्स जागोजागी नजरेत भरत होती...पण आज घरुन बांधून आणलेल्या जेवणावरच ताव मारावा लागणार होता.त्यामुळे केवळ फ्लेक्सवरच्या मेनू पाहून मन भरण्याचा प्रयत्न सुरू होता.
कोल्हापुर शहरापासून बाहेर पडल्यावर  अर्ध्या एक तासाने एका बऱ्यापैकी सावलीच्या झाडाजवळ विजूभावने गाडी थांबवली.सगळे खाली उतरलो.चांगली जागा बघून चटई अंथरुन पोटपूजा करायला सुरुवात झाली.आम्ही सात जण होतो.घरुन आणलेल्या विविध पदार्थांची रेलचेल होती.पदार्थांनी पत्रावळीभरली होती.भजी,म्हाद्या, भरलं वांगं, चटण्या , सलाड आणि चपाती मस्तच बेत होता.सगळेजण हसत खिदळत , मनमोकळ्या गप्पागोष्टी करत जेवत होतो..बऱ्याच दिवसांनी रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली गवतावर चटई अंथरली होती.निसर्गरम्य परिसरात, ऊसाच्या शेताजवळ आमची पंगत बसली होती.जेवणानंतर ताक आणि मुखशुद्धीला चणेफुटाणे शेंगदाणे असा घरगुती बेत झाला.थोडावेळ तिथेच विसावून तद्नंतर आम्ही पन्हाळगडाकडे निघालो होतो..थेट वळणावळणाच्या चढ उताराच्या रस्त्याने किल्ले पन्हाळगडाकडे प्रस्थान करत होतो...
        काहीवेळाने गाडी पठारावर आल्यावर योग्य ठिकाणी पार्किंग केली आणि गडावर फेरफटका मारायला निघालो.बऱ्यापैकी ऊन लागत होतं.एस.टी.बसथांब्याच्या  जवळच असलेल्या ऐसपैस चौकात अतुलनीय पराक्रम गाजविलेल्या वीररत्न शिलेदार बाजीप्रभू देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे. त्यास अभिवादन केले.आणि सर्वांचा ग्रुपफोटो काढला.जवळच निष्णात फोटोग्राफर  दुर्गप्रेमींचे  शिवकालीन पेहरावात शस्त्रांसह फोटो शुट करीत होते....
तदनंतर आम्ही पुढे निघालो.
        पन्हाळगड दक्षिणद्वार व स्वराज्याची शान असणारा किल्ला, 
स्वराज्य संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक
छत्रपती संभाजीराजे यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला गड, इतिहासातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार असणारा पन्हाळगड पहाताच नजरेसमोर अनेक ऐतिहासिक घटनांचे प्रसंग उभे राहिले.आदिलशहाचा सरदार सिद्दी जौहर याने पन्हाळ्याला वेढा घातला होता.यातून शिताफीने आणि कल्पकतेने वेढा पार करून महाराज विशाळगडाकडे  सुखरूप पोहोचले होते.त्यावेळी स्वराज्याचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे आणि शिलेदार शिवा काशिद  स्वराज्याचे रक्षणार्थ जीवावर उदार  झाले होते.केवढा तो स्वराज्यासाठी त्याग..शिलेदार कोंडाजी फर्जंद यांनी केवळ ६० मावळ्यांसह अतुलनीय कामगिरी करुन रात्रीच्या अंधारात बेलाग कडा यंगून शत्रुच्या घश्यात हात घालून  जिंकलेला , सर केलेला किल्ला...
अशा नरविरांना शूरवीरांना  मानाचा मुजरा,त्रिवार अभिवादन.. भेटूया उद्या पन्हाळगडवर तोपर्यंत नमस्कार.....

भाग क्रमांक-१२२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com


वाचकमित्र प्रतिक्रिया

[10/12, 9:41 AM] tambe sir: 
अप्रतिम लेखन सर, लॉकडाउनच्या काळात आपल्या लेखणीने जवळपास आम्हाला महाराष्ट्र दर्शन घडवलं.
122 भाग लिहिणे सोपी गोष्ट नाही.आणि त्याहीपेक्षा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत प्रत्येक
 ठिकाणी सहलीचा आस्वाद घेणे, आजच्या काळात अशक्य अशी गोष्ट आहे.
आपल्या लेखणीने घरबसल्या महाराष्ट्र दर्शन होत आहे🙏😊😊😊
श्री गणेश तांबे सर फलटण
___________________________________________________
[10/12, 9:44 AM] nitin jadhav sir aapati: 
खूप सुंदर लेखन...

वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे खूपच सूक्ष्म माहिती आपल्या ला नव्याने समजते.
सातत्याने ज्ञानात भर घालणा-या लटिंगे सरांना मनःपूर्वक धन्यवाद ‼

लिखते रहो..हम पढते रहेंगे..🌹👍
श्री नितीन जाधव सर जावली 
___________________________________________________

श्री रविंद्र लटींगे सर, खास अभिनंदन... 
प्रत्येक जण पर्यटन करतो, भरपूर फिरतो.. परंतू अगदी थोडे जण त्याच्या नोंदी ठेवतात... 
त्यापैकी तुम्ही एक.. की आपण घेतलेला आनंद इतरांना वाटावा खरंच 
हे एक पुण्याईच काम तुम्ही करताय असे वाटते... 
श्री. तांबे सर, म्हणतात, त्याप्रमाणे घरी बसून आम्ही सर्वांनी महाराष्ट्र भटकंतीचा आनंद घेतलाय.. आणि घेणार आहोत.. तुमच्या नजरेतून विविध ठिकाणे.. पुन्हा एकदा पाहतोय.. 
खूप छान लिहिताय...  देवी सरस्वती 
तुम्हाला नक्कीच प्रसन्न आहे... 
   सुख, समाधान.. आनंद दुसऱ्याला दिल्याने वाढतो... तसा तो तुमच्या जीवनात ही सतत राहो.. 
   असेच छान छान आम्हाला वाचायला मिळो.. हीच मंगल कामना 
    आपलाच.. राजेंद्र वाकडे.. तारळे...
_____________________________________________

श्री रविंद्र लटिंगे सर 
आपली भटकंती आम्हाला खूप प्रेरणा देत असते परंतु आपल्या लेखनीतील बारकावे मनाला मोहित करतात . असे वाटते की जणू आम्हीही प्रत्यक्ष त्याठिकाणी आहोत व मनमुराद आनंद घेत आहोत . आपल्या लेखणीला सलाम !🙏🙏
श्री जालिंदर गोरे सर आपण

_________________________________________________

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड