श्रीराम वरदायिनी पेठपार काव्य पुष्प १११
नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗
पेठपार निवासिनी श्रीराम वरदायिनी माता ....चरणी शतशः नम:
काव्य पुष्प
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा
पावन परिसर गौरवशाली शौर्याचा
घनदाट अरण्यी मातेचे राऊळ
दिव्यांनी उजळे नवरात्रीत देऊळ ||
पवित्रमांगल्याचा घट
श्रद्धा भावभक्तीचा पट
संस्काराचे ज्ञानपीठ
आदिमायेचे शक्तीपीठ ||
विचारांची पुष्पमाला बांधली
सजावट पर्णमालेची सजली
चैतन्याचा तेवता नंदादीप
दिसे तेजोमय मातेचे रुप ||
भक्तिभावाने जन लोटती
देवीपुढे नतमस्तक होती
मातेची थोरवी फार अपार
चैतन्य ऊर्जेचा करी पाझर ||
प्रभुरामाची वरदायिनी
माता श्रीराम वरदायिनी
पेठपारला जाऊ दर्शनाला
रुप ह्रदयात साठवयाला ||
काव्य पुष्प १११
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
फोटो साभार श्री अमित कारंडे सर
खूप सुंदर!
ReplyDelete