माझी भटकंती धार्मिक सहल दौलताबाद किल्ला ११६
माझी भटकंती
भाग क्रमांक-११६
धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन २००० सहावा दिवस
🔆दौलताबाद किल्ला❄️
बाहेरुन आकर्षक आणि आतून आश्र्चर्यचकित वाटणारा दौलताबाद किल्ला.यादव राजाने बांधलेला देवगिरी मुघल आक्रमणानंतरचा दौलताबाद किल्ला.अनेक ऐतिहासिक राजघराण्यांच्या कार्यकाळाचा साक्षीदार..किल्ल्याची रचना अतिशय बळकट आणि अभेद्य आहे.पायथ्याचा सपाट भाग आहे.इतिहासाची अनुभूति घ्यायला किल्ले चढून जावेच लागते.किल्ला बघताना आणि ऐतिहासिक प्रसंगाचे थरारक वर्णन गाईडकडून ऐकताना खरा भुलभुलैय्या आणि चकवा आपल्याला समजतो.किल्ल्याला शहरापासून तटबंदी आहेत.अंबरकोट,महाकोट,कालाकोट आणि किल्ला तटबंदी ओलांडून आपण किल्ल्यावर पोहोचतो. प्रवेश तिकिटे काढून किल्ल्यावर बघायला निघालो.खंदकावरील पूल ओलांडून आपण तटबंदीच्या भागात येतो.पहिला लाकडी दरवाजा आहे.त्यावर मोठमोठे अणकुचीदार खिळे ठोकलेले आहेत.जवळच पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.पुढील भागात चौक असून त्याच्यापुढे दुसरा दरवाजा आहे.इथं आपणाला बघायला मिळतात.पुढे एक मोठा बांधीव दगडी हौद आहे.याच पाण्याचा उपयोग किल्ल्यावर होत असे.कालाकोट तटबंदी ओलांडून आपण आतमध्ये आल्यावर बुरुज दिसतात.आणि चांद मिनार आपले लक्ष वेधून घेतो.विजयाप्रित्यर्थ हा बांधला आहे.याची उंची ३०मीटर असून चार मजली आहे.जायला आतून गोलाकार जिना आहे.हवा व उजेडासाठी झरोके व खिडक्या आहेत.शत्रूवर नजर ठेवण्यासाठी टेहळणी मनोरा होय.दिंडी दरवाजातून पायऱ्याने वर चिनी महालाकडे जातो.इथं अनेक खोल्या व दालनं आहेत.वाड्याच्या समोरच मेंढा तोफ ठेवलेली आहे.ती पंचधातुची आहे.त्यावर लेख आहे.ती चौफेर फिरवता येते.बुरुजावरुन किल्ल्याच्या सभोवतालचा खंदक दिसतो.
खंदकातून पुढे आपण काटकोनात वळल्यावर आपल्याला तिसरे प्रवेशद्वार लागते.तिथं अतिशय निमूळती व अरुंद वाट आहे.ती कातळात खोदलेली असून समोर गुहेसारख्या अंधाऱ्या खोल्या आहेत.आणि इथूनच चालू होतो देवगिरीचा भुलभुलैय्या मार्ग प्रवेशद्वार लेण्यासारखे आहे.त्यापुढे चौक त्याच्यापुढे ऐकल्यावर चढावे लागते.शत्रूची फसवणूक करायला चकवा द्यायला चोरवाटा केलेल्या आहेत.सैनिक फिरुन फिरुन एकाच जागी येणार आणि गोंधळात पडणार.त्याच्यापुढं अंधारवाटा . वाट बघण्यासाठी मशाल पेटवूनच आत जावे लागते.अशा चकवा देणाऱ्या
वेगवेगळ्या युक्त्या वापरून गड अभेद्य बनविलेला आहे.आपण बघताना आणि ऐकताना आश्र्चर्यचकित होतो.नवल आणि कुतूहल वाटते..बनवणाऱ्या किमयागारास सलाम आणि मानाचा मुजरा.हा भुलभुलैय्याचा मार्ग ओलांडून आपण कातळकड्यात येतो.येथेही आपल्याला काळीपहाड व धूळधाण तोफा बघायला मिळतात.तिथं या किल्ल्याचे किल्लेदार जनार्धन स्वामींच्या पादुका आहेत.दीडदोन तास किल्ला पाहून आम्ही परतीच्या मार्गाने पायथ्याशी आलो.या किल्ल्याचा इतिहास पुस्तकात वाचून आणि शिकविलेला प्रत्यक्ष भेटीनं उजाळा मिळाला.तदनंतर आम्ही सुमारे १०० किमीवरील श्री साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीकडे मार्गस्थ झालो... साधारण तीन एक तासांच्या प्रवासानंतर आम्ही शिर्डीला पोहोचले.रात्रीचे आठ वाजले होते.भक्तनिवासात कॉमन रुममध्ये आमची व्यवस्था झाली.आज फिरणं भटकणं जास्तीचं झालं होतं म्हणून दर्शन उद्या लवकर घेवू.असं ठरवलं .प्रदेश होऊन प्रसादालयात सात्त्विक भोजनाचा लाभ घेतला.रुमवर येवून छानपैकी विश्रांती घेतली.
भेटूया उद्या शिर्डीचे देवदर्शन करायला तोपर्यंत नमस्कार...
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
भाग क्रमांक ११६
Comments
Post a Comment