जागरण गोंधळ काव्य पुष्प ११५






🍁🌾☘️🍂🌾🌻
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗
🕯️  जागरण गोंधळ 🕯️
कलावंत महिमा गाती 
जागरण गोंधळ घालती 
भजन कीर्तन आख्यान असे
अनेक रुपक सादर करती 🕯️

टिपऱ्या दांडिया नाच रंगती 
भक्तीभावे गाती आरती 
होम हवन मंत्राजली अर्पती 
उदकशांतता प्रसन्न करती 🕯️

प्रकाशाचे दिवे तेवती राउळी
नवरात्री लख्ख तेजोभान दीपमाळी 
विद्युत रोषणाईचा झगमगाट देऊळी 
मंत्रजागराचा  घोष सदाकाळी 🕯️

रेखाटती रांगोळ्याअंगण दारी 
फुलांची तोरणं लटकती दारोदारी
आनंदाला उधाण येते घरीदारी 
उपासनेने सुख नांदू दे घरोघरी 🕯️
काव्य पुष्प ११५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड