महिला मेळावा आजीचे कवन- १२३




✒️ महिला मेळावा 📚
   ( आजीचे कवन )

नात माझी थोर स्त्रियांच्या 
कार्याची गोडवी भाषती 
व्यासपीठी समद्या आज्या  
ध्यान  देवूनी  ऐकती |

मुलांनो शाळा लयी शिका 
असं सांगती थोर फुले शाहू
बाबासाहेबांचे चरित्र वाचून    
त्यांच्या पुस्तकप्रेमाचा वसा घेऊ  |

नाही कधी मान मिळाला
सामाजिक कार्यक्रमात 
आज मातर मान दिला 
महिला मेळाव्यातल्या खुरचित|

काय बया झालं कवतिक  
बोलताना पोरं हासली  
मजा त्यांना वाटती 
आजी आज अतिथी झाली |

आमी शाळेत नाय गेलो 
पण जगायची शाळा शिकलो 
हसायच्या खेळायच्या वयी 
सासरच्या परपंच्याला लागलो|

सालपाई देवीच्या अंगणात 
जमला महिलांचा मेळा 
फेर धरूनी गाऊया 
झिम्मा फुगडीच्या खेळा |
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे 
काव्य पुष्प-१२३

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड