धरण परिसर काव्य पुष्प १२१








     


    🍂  धरणपरिसर🍂
    (पाणलोट क्षेत्र )

नभी धवल ढगांनी
कापूस पिंजारला
निळ्या आकाशी 
नजारा सजला❗

क्षितीजावर एकी 
निळसर ढगांची 
गर्द  वनराई 
डोंगर रांगांची❗

जलसंपदा ओथंबली 
पाणलोट क्षेत्र भरले
झाडंवेली काठी सजली 
रम्य दृश्य नजरेत साठवले❗

मन मोहरले,मोर झाले
आनंदाने नाचू लागले 
निसर्गाचं भरभरून देणं
आपलीच ओंजळ रिती राहणं❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प१२१
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड